Tuesday, October 11, 2011

poem by kalpesh

सरी !



रिमझिम बरसणार-या
पावसाच्या सरीत
जिवाला गुंतवु नये…
कधीतरी........
पावसाच्या सरीही
ओसरणर-या असतात.
शब्दाच्या बुडबुड्यात
कस्तुरी शोधु नये…
कधीतरी ......
कस्तुरीम्रुगही…हरवणारा असतो
त्या पावसाच्या सरीसारखा…
……कणभरसुद्धा मागमुस न ठेवता…!!

मानल तरच सुख ना???

जीवन हा एक प्रवास
आणि आपण प्रवासी
त्या वाटेवरचे कधी सुखाचा उतार
तर कधी दु:खाची चढण
थोडी कमी जास्त
पण प्रत्येकाच्या वाट्याला येणारी
अगदी न चुकता,
हा प्रवास कधीही न संपणारा संपतो
फक्त मृत्यूच्या दारात,
मग हा खटाटोप कशासाठी
सुखाची हिरवळ शोधण्यासाठीच ना,
पण सुख तर एक मृगजळ,
कधीही हाती न येणारे
आणि या मृगजळाचे बनलेच पाणी
तर कधीही तृप्त न होणारे
मग सुख म्हणजे तरी काय,
जे दु:ख नाही तेच तर ना
ज्याचे अस्तित्व पाण्याच्या बुडबुड्यासारखं,
क्षणिक मिळवू का आपण कधी सुख ?
जर असाच पाठलाग करत राहिलो
तर पाहूया ना प्रत्येक दु:खाला आपलसं करुन,
पाहूया ना प्रत्येक दु:खाला सहानुभूतीने
नक्कीच सापडेल त्यांत आपलं सुख
शेवटी मानल तरच सुख ना ? ?

No comments:

Post a Comment